श्री श्रीकांत निबंधे यांची रक्तदानासाठी प्रेरणादायक पाऊले

श्री श्रीकांत निबंधे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रुपये ५१०००/- धनादेश ठाणे रक्तकेंद्र पालक श्री. प्रदीप पराडकर तसेच कार्यकारणी सदस्य श्री अजय पाठक यांच्याकडे सुपूर्द केला श्री श्रीकांत निबंधे हे TSPL या कंपनीचे मालकही आहेत त्यांनी आपल्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले की किमान एक रक्तपिशवीचे रक्कम देणगी म्हणून द्यावी आणि त्यांना २० कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन रू. ३२०००/- जमा केले. आपण तर केलेच पण आपल्या सहकार्यांना आवाहन करून त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरित केले याबद्दल श्री निबंधे यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ते स्वतः ठाणे रक्त केंद्राच्या निधी समितीचे एक सदस्य आहेत

रक्तकेंद्रास भेट देणाऱ्या सेवा इंटरनॅशनलच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका

काल सौ.निलिमा चिमोटे ,मूळ डोंबिवलीकर,भारतीय मजदूर संघ आणि महिला समन्वय कार्यकर्त्या सध्या सेवा इंटरनॅशनल यु.के.कार्यकर्त्या, वास्तव्य बर्मिंगहॅम,यु.के.आणि रमेशजी सुब्रमण्यम -को ऑर्डिनैटर सेवा इंटरनॅशनल यांनी रक्तकेंद्राला भेट दिली.

कै.वामनराव ओक रक्तकेंद्रात ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने रक्तदान करणाऱ्या महिलांचा सत्कार

या वर्षी दिनांक १० मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात रक्तकेंद्रात साजरा करण्यात आला. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपुर्ण देशभरात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने कै. वामनराव ओक रक्तकेंद्रात रक्तदान करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी होणार्या महिलांना रक्तकेंद्रात निमंत्रित करण्यात आले होते. सर्वमहिलांचे स्वागत तुलशीचे रोप, पुस्तक आणि श्रींची प्रतिमा देवून करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्त्या डॉ. सौ. मधुरा कुलकर्णी मॅडम यानीं मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रकल्प अध्यक्ष श्री किरण वैद्य सर, सौ. कविता वालावलकर मॅडम, डॉ. विवेक बोंडे सर, सर्व महिला कर्मचारी, तसेच महिला रक्तदात्या सहभागी झाल्या होत्या. उपस्थित सर्व महिलांची हिमोग्लोबिन आणि शुगर टेस्ट करण्यात आली.

दिव्यांगांचे सामाजीक जाणिवेतून रक्तदान

दिव्यांग विकास आघाडी ठाणे आणि जनहित फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त दिव्यांग रक्तदान शिबर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दिव्यांगांनी रक्तदान केले. जनहित फाउंडेशन हि संस्था दिव्यांगांसाठी काम करते. दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रक्तकेंद्राच्या प्रकल्प समिती पदाधिकाऱ्यांनी या शिबिराला भेट दिली. श्री प्रदीपजी पराडकर प्रांत कोषाध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

अॅड. व्ही बी देशपांडे कॉलेज ऑफ कॉमर्स(नाईट) मुलुंड येथे कॉलेज विद्यार्थ्यांचे रक्त गट आणि हिमोग्लोबीन तपासणी शिबीर

दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी मुलुंड (पश्चिम) येथील अॅड. व्ही बी देशपांडे कॉलेज ऑफ कॉमर्स (नाईट) येथे विध्यार्थाना आहार आणि दैनदिन जीवनचर्या या विषय माहिती मिळावी म्हणून ओक रक्तकेंद्राच्या डॉक्टर रेश्मा सावंत यांना ‘आहार व जीवनचर्या याचा शरिरावर होणारा परिणाम’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते. डॉ रेश्मा सावंत यांनी मार्गदर्शन केले. या नंतर कै. वामनराव ओक रक्तकेंद्राच्या मदतीने विद्यार्थ्यांचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ५४ विद्यार्थांनी त्याचा लाभ घेतला. प्राचार्या डॉ. सौ. अनेकर आणि NSS विभाग यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी श्री.सुरेन्द्र बेलवलकर, प्रा.सौ.अनेकर मॅडम या उपस्थित होत्या.

श्री.राममंदिर प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळा कार्यक्रम, कारसेवकांचा सन्मान

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आनंद सोहाळा कार्यक्रम आयोजित करुन या मध्ये कारसेवेत सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्य वक्ते आणि अध्यक्ष श्री.अरुण करमरकर हे होते. सौ.अंजली ढोबळे यांनी कारसेवेतील सहभागातिल अनुभव सांगितले. श्री.अभिजीत कासखेडीकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री.अमेय चितळे यांनी प्रस्ताविक केले. प्रकल्प अध्यक्ष श्री.किरण वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. खालील कारसेवकांचा सन्मान मानपत्र आणि श्रीफळ-शाल देवून करण्यात आला. १)श्री सुजीत साठ्ये. २) श्री.महेश जोशी. ३)मिलिंद जोशी. ४)श्री.प्रदीप पराडकर. ५)श्री.सुरेन्द्र बेलवलकर. ६)श्री.किशोर भावसार. ७)डॉ.सौ.अंजली गांगल. ८)सौ. अंजली ढोबले.

NTPC च्या अधिकाऱ्यांची कै.वामनराव ओक रक्तकेंद्राला सदिच्छा भेट

दिनांक ९ जून २०२४ रोजी NTPC च्या अधिकाऱ्यांनी रक्तकेंद्राला भेट दिली आणि या निमित्ताने NTPC च्या CSR निधी २०२३-२४ मधून खरेदी केलेल्या यंत्रांची पाहणी केली.या यंत्रांची अवश्यकता का होती आणि हे यंत्र आल्या नंतर काय बदल झाला या संबंधी माहिती डॉ. विवेक बोंडे यांनी दिली. त्या नंतर सर्व प्रकल्प समिती च्या पदाधिकाऱ्यांसोबत परिचय आणि रक्तकेंद्राने भविष्यातील हाती घेतलेल्या उपक्रमां संदर्भात माहिती दिली. या वेळी श्री उपेंद्र मिश्रा CSR विभाग प्रमुख NTPC लिमिटेड, श्री. विद्याधर वैशंपायन संचालक तसेच अन्य दोन संचालक उपस्थीत होते

थॅलेसेमिया प्रकल्प अहवाल, कै. वामनराव ओक रक्तकेंद्र ठाणे, (सप्टेंबर २०२३ ते जुलै २०२४)

एकूण शिबिरांची संख्या ३२, गोळा केलेले नमुने 2912, नमुने तपासण्यात आलेले 2895, थॅलेसेमिया मायनर 96 आढळले, सिकलसेल 68, कमी आणि असामान्य Hb155 संख्या. 18 ठिकाणी थॅलेसेमिया व सिकलसेल जनजागृतीपर व्याख्याने देण्यात आली. ठाणे जिल्हातील भिवंडी, शहापूर, मुरबाड अशा ग्रामीण तालूक्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये कॅम्प झाले. तसेच नेरूळ नवीमुंबाई महानगर पालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालय येथे ५ कॅम्प घेण्यात आले. १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिना निम्मित मुरबाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कॅम्प घेण्यात आला येथे १०५ जनांचे नमुने गोळा करण्यात आले.

Scroll to Top